Published On : Fri, Apr 13th, 2018

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

Advertisement

Leopard-cub-killed
नागपूर: अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील कोंढाळी पासून ९ कि. मी . अंतवरील जुनापाणी गावापसून पाचशे मिटर अंतरावर बिबट प्रजातीचा वन्यप्राणी अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. ही माहिती महामार्ग सुरक्षा पोलीसांनी कोंढाळी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना पहाटे ५.३५ वाजताच्या दरम्यान दिली.

घटनेची माहिती मिळताच कोंढाळीचे वन परिक्षेत्र अधिकारी एफ. आर. आजमी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मृत बिबट्याचा घटनास्थळ पंचनामा केला. नंतर उपवन संरक्षक मल्लिकार्जून, ऐ .सी .एफ. एस. एन. क्षिरसागर आणि रेंजर एफ आर आझमी यांच्या समक्ष पशूवैद्यकीय अधिकारी अनील ठाकरे , अरूण हांडा आणि चेतन यांनी शवविच्छेदन केले. मृत बिबटयाच्या शवाला चमेली वन विश्राम गृहात अग्नी देण्यात आला. मृत बिबट अंदाजे दीड ते दोन वर्षाचा असल्याचे सांगण्यात आले. दोन वर्षात नागपूर- अमरावती महामार्गावर चार वाघ अज्ञात वाहनांच्या धड़केत ठार झाले आहेत.