Published On : Thu, Oct 5th, 2017

…तर अभिनेत्री हेमा मालिनीच्या घरी चोरट्यांनी केले हात साफ

Hema Malini
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी या रशिया आपल्या फॅन्ससोबत एन्जॉय करत असताना अंधेरीतील त्यांच्या घराच्या गोडाऊनमध्ये चोरट्यांनी हात साफ केले आहे.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, हेमा मालिनी यांच्या गोडाऊनमध्ये चोरी झाली आहे. 90 हजारांची इमिटेशन ज्वेलरी तसेच गोदामातील दोन कपाटे व एक एसी चोरीला गेला आहे, तिच्या नोकरानेच ही चोरी केल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात नोकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, हेमा मालिनीच्या जुहू येथील गोडाऊनमध्ये संगीत, नाटय़ तसेच डान्स शेसाठी लागणारी इमिटेशन ज्वेलरी तसेच अन्य साहित्य आहे. साहित्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी एका नोकराची नेमणूक केली आहे. परंतु त्याने हेमा मालिनी यांच्या केवळ इमिटेशन ज्वेलरीच लांबवली नाही, तर दोन कपाटे व एक एसीदेखील चोरल्याचे पोलिसांकडे आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जुहू पोलिस पुढील तपास करत आहेत.