Published On : Thu, Oct 5th, 2017

मुंबईत पुन्हा होऊ शकतो 1993 सारखा बॉम्बस्फोट

Advertisement

dawood-brothers

मुंबई: मोस्ट वाँटेड कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईत पुन्हा 1993 सारखा बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दाऊदचा भाऊ आणि भारतातील त्याच्या पंटरमधील झालेले संभाषण ट्रेस केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

रिपोर्टनुसार, दाऊद इब्राहिम आणि त्याची डी कंपनी मुंबईत तब्बल 24 वर्षांनंतर मोठ्या घातपाताचा कट रचत आहे. दाऊदचा भाऊ आणि भारतातील पंटरसोबत झालेले बोलणे इंटरसेप्ट केल्याने एक मोठा खुलासा झाला आहे. त्यांच्या संवादामधून मुंबई पोलिसांनी मोठी माहिती हाती लागल्याचे बोलले जात आहे. दाऊदच्या या ब्लॅक फ्रायडे प्लॉटविषयी केंद्र सरकारलाही माहिती देण्यात आली आहे.

Gold Rate
10 May 2025
Gold 24 KT 94,700/-
Gold 22 KT 88,100/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, देशातील सर्वात महत्त्वच्या आणि शक्तिशाली ठिकाणी दाऊदचे पंटर आजही आहेत. अशा परिस्थितीत दाऊदच्या विश्वासू माणसांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस आणि केंद्रीय यंत्रणांसमोरील मोठे आव्हान आहे.

रिपोर्टनुसार, दाऊद आणि त्याचे हस्तक मुंबईत हल्ल्यासारखी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. आता पोलिस आणि केंद्रीय एजन्सी दाऊदला या कामात मदत करत असलेल्या लोकांच्या शोधात आहेत.

दरम्यान, इक्बाल कासकर विरोधात 16 दिवसांत तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका बिल्डरला तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी इक्बाल कासकरविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता इक्बालविरोधात खंडणीच्या तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

18 सप्टेंबर रोजी एका खंडणी प्रकरणात कासकर आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली. त्यानंतर दक्षिण मुंबईच्या गोराई भागातील बिल्डरही मंगळवारी तक्रार देण्यासाठी पुढे आला. दक्षिण मुंबईतील एका प्रसिद्ध बिल्डरला कासकरने 3 कोटींची खंडणी मागितली होती. त्यानुसार बिल्डरने त्याला दोन हप्त्यांत ही रक्कम दिली.

Advertisement
Advertisement