Published On : Tue, Sep 3rd, 2019

कांद्री खदान येथे अंडरपासचे भूमिपूजन समारंभ

Advertisement

– केंद्र सरकार कडून रुपये 10कोटी 84 लक्ष रुपयांचा निधी मंजूर . .

रामटेक – गट ग्रामपंचायत कांद्री खदान समोर सर्विस रोडसह अंडरपासचा भूमिपूजन समारंभ आमदार सरपंच परमानंद शेंडे,राष्ट्रीय राजमार्ग अधिकारी यांच्या उपस्थितीत व ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील जेष्ठ नागरिक यांचे उपस्थितीतआमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे हस्ते पार पडले. नागपूर – जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग असून दोन वर्षा अगोदर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले परंतु या चौपदरी करणामुळे कांद्री या गावाचे दोन भागात विभाजन झाले असल्यामुळे लहान शाळकरी मुले, म्हातारे, शेतकरी व त्यांची जनावरे यांना रोड ओलांडणे म्हणजे जीव हातात घेऊन चालले असे झाले होते.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते.राष्ट्रीय राजमार्ग अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने दिल्या नंतरही त्यांनी कामाकडे दुर्लक्ष केले म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून परमानंद शेंडे यांनी गावकरी लोकांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी आंदोलन स्थळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी भेट देवून अंडरपास बनविण्या संदर्भात आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास सांगितले ‌.

आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी आश्वासन दिल्या प्रमाणे दिल्ली दरबारी प्रश्न रेटून धरला व सर्विस रोडसह अंडरपासच्या बांधकामासाठी केंद्र सरकार कडून रुपये 10कोटी 84 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करवून दिला.भुमीपुजन समारंभात रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी , सरपंच परमानंद शेंडे , उपसरपंच मंजित बहेलिया, राष्ट्रीय राजमार्गचे रिजनल मॅनेजर चंद्रशेखर, प्रकल्प अधिकारी काळे, गाडेकर प्रकल्प अधिकारी, प्रकाश दानवे, तावडे मॅडम,ग्रा.पं.चे सर्व सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण बघावयास मिळाले .ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आमदार रेड्डी यांचे आभार मानले .

Advertisement
Advertisement