Published On : Tue, Sep 3rd, 2019

आन लाईन बुकींगवर पुन्हा सर्व्हिस चार्ज

नागपूर : डिजीटल व्यवहाराला चालणा देण्यासाठी आॅन लाईन रेल्वे तिकीट बुक करणाºयांकडून सेवा शुल्क माफ करण्यात आला होता. अर्थात तो शुल्क सरकारकडून भरला जात असे. आता रेल्वे मंत्रालयाने रविवारपासून आॅनलाईन रेल्वे तिकीट बुक करणाºया प्रवाशांना पुन्हा सर्व्हिस चार्ज लावणे सुरू केले आहे.

इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरीझम कार्पोरेशनने (आयआरसीटीसी) जारी केलेल्या आदेशानुसार प्रवाशांना आॅनलाईन तिकीट बुक करण्यासाठी स्लिपर क्लाससाठी १५ रुपये प्रति तिकीट आणि एसी क्लाससाठी ३० रुपये प्रति तिकीट सेवा शुल्क वसूल करण्यात येणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सेवा शुल्क आकारल्यानंतर जीएसटीही प्रवाशांकडून वसूल करण्यात येणार आहे. तज्ज्ञांच्या मते ही प्रवाशांची लूट आहे.

Advertisement

सेवा शुल्काच्या नावावर आयआरसीटीसी एका आरक्षणाच्या तिकीटावर एका प्रवाशाच्या जनरल तिकिटाचा खर्च वसूल करीत आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी ३ वर्षांपुर्वी सेवाशुल्क बंद करण्यात आले होते. यापूर्वी आयआरसीटीसीतर्फे स्लिपर क्लास ई तिकिटासाठी २० रुपये, एसी क्लाससाठी ४० रुपये सेवाशुल्क वसूल करण्यात येत होते. आता आयआरसीटीसीने आॅनलाईन तिकीट घेणाºया प्रवाशांकडून सेवा शुल्कास मंजुरी दिली आहे. सेवा शुल्क माफ करण्याची योजना काही दिवसांसाठीच होती,असे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे.

Advertisement

मध्य रेल्वेच्या झेडआरयुसीसी सदस्यांनी ही प्रवाशांची लूट असल्याचे सांगून त्यास विरोध दर्शविला आहे. आधी सेवा द्या मग शुल्क आकारा, रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेची १०० टक्के हमी दिल्यास प्रवाशी स्वत: सर्व्हिस चार्ज देतील, असे सदस्यांचे मत असून प्रवाशांची ही लूट थांबविण्याची मागणी केली आहे.

प्रवाशांवरील बोझा वाढणार
‘ई तिकीट काढल्यामुळे प्रवाशांवर बोझा पडणार आहे. प्रवाशांना सवय लावण्यासाठी सेवा शुल्क आकारण्यात येत नव्हते. प्रवाशांना ई तिकिटाची सवय लागल्यानंतर सेवा शुल्क सुरु करण्यात आले आहे. याशिवाय जीएसटी वेगळा वसूल करण्यात येईल. रेल्वे सेवा देत नसून व्यापार करीत आहे. यामुळे प्रवाशांवरील बोझा वाढणार आहे.’

-प्रवीण डबली, माजी झेडआरयुसीसी सदस्य, दपूम रेल्वे

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement