Published On : Mon, May 28th, 2018

मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट सर करणाऱ्या ५ आदिवासी विद्यार्थ्यांचा २५ लाख रुपये देऊन गौरव करणार – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

Advertisement

मुंबई: मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ५ आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ लाख रु. चे पारितोषिक देऊन गौरविले जाणार असल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

आज यासाठी श्री.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रत्येकी 10 लाख रु. देऊन गौरविले जाईल.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना गृह विभागात नोकरी देण्याची मागणी आपण मुख्यमंत्री महोदयांकडे केली असल्याचेही श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले
16 मे रोजी या पाच विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर चंद्रपूर आणि महाराष्ट्राचा ध्वज फडकवला होता या धाडसाची दखल काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमात घेतली. राज्याच्या आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांच्या उपजत धाडसाला मिशन शौर्यच्या माध्यमातून एव्हरेस्ट सर करण्यासाठी प्रशिक्षित केले होते. चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभाग गेले वर्षभर या मोहिमेसाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न करत होते.

चंद्रपूरसारख्या आदिवासी भागात मुळात काटक असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना थंड प्रदेशातील एव्हरेस्टच्या मोहिमेवर सिद्ध करण्यासाठी उत्तर भारतातील महत्वाच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षित करण्यात आले होते. सुरुवातीला 50 विद्यार्थ्यांमधून वेगवेगळ्या चाचण्या करत 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या खडतर प्रवासात शेवटी 5 विद्यार्थी यशस्वी ठरले. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, प्रथमेश आले आणि मनीषा धुर्वे यांचा समावेश आहे.

हे विद्यार्थी उद्यापर्यंत मुंबईत दाखल होत असून राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत या धाडसी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल.

Advertisement
Advertisement