Published On : Wed, Apr 4th, 2018

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत विम्याचे संरक्षण

Advertisement

farmers

Representational Pic


नागपूर: शेती व्यवसाय करताना व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अपघात प्रसंगी शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत असून ही योजना यावर्षीही सुरु ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना 7 डिसेंबर 2018 या कालावधीसाठी राहणार आहे.

शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा अवयव निकामी होणे यासाठी 2 लक्ष रुपयाचे विम्याचे संरक्षण मिळणार आहे. तसेच अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लक्ष रुपये नुकसान भरपाई गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. या योजनेत सहभाग होण्यासाठी शेतकरी 10 ते 75 वयोगटातील असावा व त्या संबंधिचे आवश्यक कागदपत्र व अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे विहीत नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अपघाताच्या प्रकारानुसार अर्जासोबत विहित कागदपत्र जोडणे आवश्यक आहे.

शेती व्यवसाय करताना शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात होतात. यामध्ये रस्त्यावरील अपघात, वीज पडणे, पूर, सर्प दंक्ष, विंचू दंक्ष, वीजेचा शॉक व वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या अपघात बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्य ओढवतो अथवा अपंगत्व येते. शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होवून अडचणीचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत अपघातग्रस्त शेतकऱ्यास अथवा त्याच्या कुटुंबास आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी, तसेच महसूल विभागाशी संपर्क साधून विम्याच्या संरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक यांनी केले आहे.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement