Published On : Fri, Apr 9th, 2021

क्रीडा समिती सभापती व्दारा मध्य नागपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत

Advertisement

आदर्श विणकर कॉलोनी क्रीडा मैदानाची पाहणी

नागपूर : नागपूर महानगरपालिका क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाणे यांनी पदभार सांभाळल्यानंतर नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रातील सहा क्रीडा मैदानांचा विकास करण्याचे उद्दीष्ठ ठरविलेले आहे. त्या अनुषंगाने आज शुक्रवार (ता.९ एप्रिल) रोजी मध्य नागपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणा-या मनपा प्रभाग क्र.२० मधील आदर्श विणकर कॉलोनी या क्रीडा मैदानाची आमदार श्री. विकास कुंभारे, स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर, क्रीडा सभापती श्री.प्रमोद तभाणे व उपसभापती श्री. लखन येरवार यांनी पाहणी केली.

Gold Rate
24 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 98,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या क्रीडा मैदानास खेळण्यायोग्य आदर्श असे क्रीडा मैदान बनविण्याकरीता मैदानाला वॉल कंपाऊड, मैदानाला समतोल करणे, दोन टॉवर इलेक्ट्रीक पोल, व्हॉलीबॉल पोल आणि बॅडमिंटन कोर्ट ची आवश्यकता असल्याचे मध्य नागपूरचे आमदार श्री.विकास कुंभारे यांनी सूचना केली. वरिष्ठ नागरिकांसाठी ग्रीन जीम लावण्याबाबत स्थायी समिती सभापती श्री. प्रकाश भोयर यांनी सूचना केली.

वॉल कंपाऊंडला गेट लावणे आवश्यक असल्याचे वस्तीतील नागरिक नरेन्द्र पाठराबे, भास्कर पराते यांनी आपले मत व्यक्त केले. उपरोक्त कार्य ताबडतोब क्रियान्वित करण्याकरीता क्रीडा सभापती यांनी संबंधीत अधिकारी यांना निर्देश दिले.

या प्रसंगी प्रभाग क्र.२० चे नगरसेवक श्री. दीपराज पार्डीकर, नगरसेविका शकुंतला पारबे, श्रीमती यशश्री नंदनवार, मनपाचे क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर, क्रीडा सभापती स्वीय सहाय्यक प्रमोद गायकवाड उपस्थित होते.

Advertisement
Advertisement