Published On : Fri, Apr 9th, 2021

‘रेमडेसीवीर’चे मूल्य निर्धारित करा

Advertisement

महापौर दयाशंकर तिवारी यांचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र

नागपूर : महाराष्ट्र त्यातल्या त्यात विदर्भ आणि नागपुरात कोरोना जागतिक महामारीने कहर केला आहे. कोरोनावरील उपचारामध्ये रेमडेसीवीर हे इंजेक्शन रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. आवश्यक औषधीमध्ये याचा समावेश असून सामान्य लोकांना त्याची टंचाई भासत आहे. काळाबाजाराचाही फटका बसत असून या इंजेक्शनचे मूल्य निर्धारित करावे, अशी विनंती महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्राद्वारे केली आहे.

Gold Rate
June 06 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 152,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,46,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौरांनी पत्रात नमूद केल्यानुसार, रेमडेसीवीरची किंमत सध्या १३०० रुपयांच्या आसपास आहे. टंचाईमुळे काळ्याबाजारात ती पाच ते सात हजार रुपयांना विकत घ्यावी लागत आहे. जर या इंजेक्शनची किंमत डी.पी.सी.ओ. अंतर्गत निर्धारित करण्यात आली तर सामान्य लोकांना इंजेक्शनची उपलब्धता सहज आणि सुलभ होईल. शिवाय आर्थिक बोझाही त्यांच्यावर पडणार नाही. ज्याप्रमाणे मास्क आणि सॅनिटायझरची किंमत निर्धारित करून सर्व देशवासीयांना मदत करण्याचे कार्य केले त्याचप्रमाणे या जीवनावश्यक इंजेक्शनची किंमत निर्धारित करून सामान्यांना आणि रुग्णांना दिलासा द्यावा, असेही महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्रात म्हटले आहे.

डॉक्टरांनीही सामान्यांना दिलासा द्यावा
सध्या कोरोनावर उपचारासाठी जो औषधोपचार केला जातो, त्याची किंमत चार हजारांच्या वर आहे. यात ८०० ते ९०० रुपयांची औषधही उपलब्ध आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सर्व सामान्य रुग्णांचा विचार करुन त्यांना झेपेल याप्रमाणे कमी किंमतीच्या औषधी लिहून द्याव्यात आणि सामान्यांना या कोव्हिडकाळात दिलासा द्यावा, असे आवाहन सूद्धा महापौरांनी केले. शुक्रवारी त्यांनी दूरध्वनी वर जिल्हाधिकारी श्री.रविन्द्र ठाकरे यांचेशी चर्चा करून त्यांना सुद्धा रेमडिसीवर ची किंमत निर्धारित करण्याची कार्यवाही करावी अशी सूचना केली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges