Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Apr 5th, 2021

  रस्ते वाहतूक मंत्रालयाचे वार्षिक नियोजन ना. गडकरी यांची महाराष्ट्रातील

  राष्ट्रीय महामार्गांच्या 54 प्रकल्पांना मंजुरी 829 किमीसाठी 4590 कोटी प्रगती का हायवे


  नागपूर: नवीन आर्थिक वर्ष सुरु होत असतानाच केंद्रीय महामार्ग वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वार्षिक नियोजनाअंतर्गत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या 54 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. 829 किमीच्या या राष्ट्रीय महामार्गांसाठी 4590 कोटी रुपयांनाही मंजुरी देण्यात आली. राज्यातील महामार्गांचे बळकटीकरण, पुलांचे बांधकाम, सुधारणा व अन्य कामांचा यात समावेश आहे.

  नागपूर उमरेड नागभीड ब्रह्मपुरी आरमोरी या मार्गाच्या मजबुतीकरासाठी 21. 51 कोटी मंजूर करण्यात आले असून 27 किमीचा हा रस्ता आहे.
  औरंगाबाद विभागात सिल्लोड अजंठा जळगाव हा दुपदरी रोज मंजूर करण्यात आला असून 4.41 किमीच्या या रस्त्यासाठी 34.6 कोटी खर्च येणार आहे. गोंदियाच्या पूर्व भागातील बायपासचे बळकटीकरण करण्यासाठी 7.36 कोटी, तर मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेले राजेगाव ते गोंदिया (बालाघाट टी पॉईंट) या रस्त्यासाठी 18.24 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील बळकटीकरण आणि क्रॅश बॅरियरसाठी सिन्नर-पांढुर्ली- घोटी-त्र्यंबकेश्वर, जवाहर-मनोर या रस्त्यासाठी 2.91 कोटींना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी चोडमपल्ली ते गुज्जीगुडम विभागात साकोली, वडसा, आरमोरी, गडचिरोली, आष्टी, आलापल्ली, सिरोंचा या रस्त्यासाठी 83.73 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे.
  तसेच गोंदिया जिल्ह्यातील चिचगड ते कोरची या 20 किमीच्या रस्त्यासाठी 12.78 कोटी रुपये मंजूर केले आहे. झालमाल विभागाअंतर्गत सावरगाव-मरुमगाव, धानोरा, गडचिरोली-मूल चंद्रपूर या रस्त्याच्या रुंदीकरण व बळकटीकरासाठी 6.95 कोटी, राष्ट्रीय महामार्ग 753 अंतर्गत कोहमारा ते गोरेगाव या रस्त्याच्या रुंदीकरण व बळकटीकरणासाठी 21.7 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

  मराठवाड्यात बार्शी-येडशी मुरुड-लातूर, रेणापूर-उदगीर-देगलूर सागरोली रोड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 चे बळकटीकरण आणि रुंदीकरणाला मान्यता देण्यात आली. या कामासाठी 30.24 कोटी खर्च येईल. तसेच परळी ते धर्मापुरी विभागात परळी धर्मापुरी पानगाव रेणापूर फाटा या रस्त्यासाठी 79.72 कोटी खर्चाला मंजुरी देण्यात आली. चार पदरी परळी बायपास ‘इपीसी मोड’ मंजूर करण्यात आला. 60 कोटी 23 लक्ष रुपये या कामावर खर्च करण्यात येतील.

  राष्ट्रीय महामार्ग 543- गोंदिया ते आमगाव देवरी कोरची कुरखेडा वडसा ब्रह्मपुरी रस्तासाठी 19.12 कोटी मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय महार्मा 353- गुज्जीगोदाम ते गोविंदपूर विभागाअंतर्गत साकोली-वडसा आरमोरी गडचिरोली आष्टी आलापल्ली सिरोंचा या महामार्गासाठी81.21 कोटी मंजूर करण्यात आले.
  नाशिक जिल्ह्यात सिन्नर, घोटी त्र्यंबकेश्वर-ज्वाहर, विक्रमगढ, मानोर, पालघर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 ए वरील क्रॉस ड्रेनेजमध्ये सुधारणा, बळकटीकरण, पुलाचे बांधकाम व अन्य कामांसाठी 4.48 कोटी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63- खारोला पाटी ते खारोला आणि बामणी ते अष्टामोड या दुपदरी महामार्गाचे बळकटीकरणासाठी 20.67 कोटी मंजूर करण्यात आले.

  गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 930- झालामाल बालोड मानपूर (छत्तीसगड सीमेजवळ) सावरगाव, मुरुमगाव, धानोरा गडचिरोली मूल, चंद्रपूर या मार्गाच्या रुंदीकरण आणि बळकटीकरणासाठी 34.03 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली. चंद्रपूर-बल्लारपूर कोठारी गोंदिपिपरी आष्टी या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 60.14 कोटी मंजूर करण्यात आले.

  राष्ट्रीय महामार्ग 548 सी- कुसलांब ते येडशी विभाग- बार्शी येडशी मुरुड लातूर, रेणापूर उदगीर देगलूर व सारगोली या रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी 49.12 कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

  कल्याण अहमदनगर नांदेड रोडवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 आणि चांदबिबि महाल ते मेहकरी रोडच्या मजबुतीकरण आणि रुंदीकरणाच्या कामासाठी 35.42 कोटी खर्च करण्यात येतील. तसेच पनवेल महाड आणि पणजी विभागाअंतर्गत मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी 29.36 कोटी मंजूर करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर घोटी त्र्यंबकेश्वर ज्वाहर पालघर हा राष्ट्रीय महामार्ग 160 ए च्या मजबुतीकरणासाठी 11.65 कोटी खर्च करण्यात येतील.
  पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग 166 वर सांगली जिल्ह्यात पेठनाका-सांगली, मीरज रोडच्या बळकटीकरणासाठी 22.62 कोटींना मंजुरी देण्यात आली. पुणे जिल्ह्यात सहा पदरी कात्रज ÷उड्डाणपुलाचे बांधकामासाठी- वाडेगाव कात्रज कोंडवा, मंतरवाडी चौक लोणी काळभोर थेऊर फाटा लोणीकंद रोडसाठी 169.15 कोटी खर्च करण्यात येतील. तसेच पटास बारामती इंदापूर अकलूज सांगोळा या राष्ट्रीय महामार्ग 965 च्या बळकटीकरणासाठी 10.37 कोटी मंजूर करण्यात आल्या आहेत.

  नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 48 ते सिन्नर मधील पालघर, घोटी, त्र्यंबकेश्वर ज्वाहर पालघर या महामार्ग क्रमांक 160 ए च्या बळकटीकरणासाठी 5.36 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. सोलापूर शहरातील जामखंडी पुलाच्या बांधकामासाठी 2.83 कोटी मंजूर करण्यात आले. रा.मा. क्रमांक 548 डी- सिकारपूर ते न्हावारा रस्त्याचे मजबुतीकरण आणि पुलाच्या बांधकामासाठी 26.11 कोटी मंजूर करण्यात आले. सोलापूर विजापूर रोडवर लहान पुलाचे बांधकामासाठी 3.98 कोटी, तर पनवेल महाड पणजी रस्त्याचे बळकटीकरणासाठी 27.6 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. रा.मा. क्रमांक 761 आणि राष्ट्रीय महामार्ग 61 बेल्हे शिरपूर रस्ता जोडणे, मजबुतीकरण आणि रुंदीकरण या कामाज्ञाी 27.04 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मोहल कुरुल, आचेगाव वळसंग, धोत्री, मुष्टी तांदुळवाडी या रस्त्याचे मजबुतीकरण आणि रुंदीकरणासाठी 54.07 कोटी मंजूर करण्यात आले.

  लातूर जिल्ह्यातील देवगाव फाटा-पाथरी, लातूर उमरगा, मुरुम अलूर, इंदी विजापुर या रस्त्यासाठी 66.72 कोटी मंजूर करण्यात आले. टेंबुरणी कुसलाम विभाग रस्त्याच्या मजबुतीकरण व रुंदीकरणासाठी 157.72 कोटी, तसेच आलापल्ली भामरागड लोहेरी, बिनागुंडा नारायणपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 130 डी अंतर्गत आलापल्ली ते भामरागड या रस्त्यावरील पुलासाठी 42.7 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. तसेच नांदगाव जंक्शन ते दौलताबाद टी पॉईंट या रस्त्यासाठी 53.89 कोटी खर्च करण्यात येतील.

  सिन्नर ते नाशिक विभाग महामार्ग क्रमांक 50 चारपदरी रस्त्याच्या कामासाठी 1.52 कोटी, तसेच टेंभुर्णी, पंढरपूर, मंगळवेढा उमाडी ते कर्नाटक सीमेपर्यंत रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी 70.67 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

  कोकणातील गुहागर चिपळूण कराड हा 13.10 किमीच्या रस्त्याच्या बळकटीकरणासाठी 16.85 कोटी, तसेच सिन्नर नाशिकक विभागातील महामार्ग क्रमांक 50 वर पीपीपी तत्त्वावर विकास करण्यासाठी 3.13 कोटी, तसेच आढळगाव जामखेड विभागात दुपदरी पेव्ह शोल्डर आणि चार पदरी रस्त्याची जुळवणी करणे आणि मजबुतीकरण करण्यासाठी 399.33 कोटी खर्च करण्यात येतील.

  दोन पदरी आणि चार पदरी सोलापूर विजापूर रस्त्याचे मजबुतीकरणासाठी 29.12 कोटी खर्च करण्यात येतील. 3.39 किमीचा हा रस्ता आहे.
  विदर्भातील पूर्णा नदीवर दोन पदरी रस्त्यावर पुलाचे बांधकाम शेगाव देवरी फाटा विभाग या कामासाठी 97.36 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तसेच कल्याण निर्मल रोड दोन पदरी पेव्ह शोल्डर रा.मा.क्रमांक 61 ठाणे जिल्हा- या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण व सुधारणांसाठी 47.66 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने या सर्व कामांना मंजुरी दिली आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145