Published On : Thu, Jun 17th, 2021

क्रीडा समिती सभापती व्दारा दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत

Advertisement

– टेलीकॉम नगर येथील सेंट्रल एक्साईज लेआऊट मैदानाची पाहणी

नागपूर : नागपूर महानगरपालिका क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाणे यांनी पदभार सांभाळल्यानंतर नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रातील सहा क्रीडा मैदानांचा विकास करण्याचे उद्दीष्ठ ठरविलेले आहे. त्या अनुषंगाने आज बुधवार (ता.१६ जून) रोजी दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणा-या मनपा प्रभाग क्र.३७ मधील टेलीकॉमनगर येथील सेंट्रल एक्साईज ले-आऊट या क्रीडा मैदानाची क्रीडा सभापती श्री.प्रमोद तभाणे व उपसभापती श्री. लखन येरवार यांनी पाहणी केली.

Gold Rate
Feb 10th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,56,800/-
Gold 22 KT ₹ 1,45,800 /-
Silver/Kg ₹ 2,61,300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या क्रीडा मैदानास खेळण्यायोग्य आदर्श असे क्रीडा मैदान बनविण्याकरीता मैदानातील कंपाऊंड वॉलच्या ग्रीलला पेन्ट लावणे, मैदानात पाणी साचून राहू नये याकरीता मैदान समतोल करणे, मैदानात ड्रेनेज लाईन ची व्यवस्था करणे, मैदानावर असलेली जूनी विद्युत व्यवस्था सुधारीत करणे, स्ट्रक्चरल दुरुस्ती , ट्रॅक ची डागडुजी, मैदानात सोप पीट, एक बी बी इन्स्टूमेंट लावणे, मैदानातील वाढलेले झाड कापणे, ग्रीन जीम च्या खाली गटटू लावणे, सुरक्षा भिंतीची दुरुस्ती, विकेट गेट, टॉयलेट बाथरुम ची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले.

उपरोक्त सर्व व्यवस्था आणि सुधारणा करण्याचे क्रीडा सभापती प्रमोद तभाने यांनी संबंधित अधिकारी यांना निर्देश दिले.

या प्रसंगी प्रभाग क्र.३७ चे नगरसेवक तथा शिक्षण समिती सभापती श्री. दिलीप दिवे, माजी महापौर श्रीमती नंदा जिचकार, लक्ष्मीनगर झोनच्या सभापती श्रीमती पल्लवी शामकुळे, नगरसेविका श्रीमती सोनाली कडू, वसाहतीतील प्रतिष्टीत नागरीक श्री. सचिन लोखंडे, महेश सावदे, श्री. रोकडे, मनपाचे क्रीडा नियंत्रण अधिकारी नितीन भोळे, क्रीडा अधिकारी पियुष अंबुलकर, क्रीडा सभापती स्वीय सहाय्यक प्रमोद गायकवाड उपस्थित होते.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement