| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jul 10th, 2019

  अनधिकृत मंदिर, दरगाह चे अतिक्रमण जमिनोदस्त

  कामठी :-करोडो रुपयाच्या निधीतून कार्यान्वित असलेल्या कामठी-नागपूर महामार्गाचे सिमेंटिकरण बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून या रस्त्याच्या कडेला असलेला पादचारी मार्ग तसेच पाण्याची निकासी होण्यासाठी अतिशयोक्ती असलेले नाली बांधकामात अडथळा निर्माण करणारे कामठी येथील महामार्गावरील पोलीस स्टेशन च्या बाजूला असलेले मुस्लिम समुदायाचे दैव्यस्थान असलेले हजरत बाबा अब्दुल्लाह शाह चिरिया शरीफ दरगाह तसेच श्री गंज के बालाजी मंदिर समोर असलेले शितला माता मंदिर चे अतिक्रमण काढणे प्रशासनाला एक आव्हानात्मक ठरले होते मात्र ही आव्हानात्मक परिस्थिती वेळेनुसार नियोजित पद्धतीने हाताळत आज दुपारी 4 वाजेपासून ह्या दोन्ही अनधिकृत दरगाह तसेच मंदिर चे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात यशस्वीरीत्या काढण्यात आले.

  हे अतिक्रमण काढतेवेळी नायब तहसीलदार रणजित दुसावार, पोलीस निरीक्षक आर आर पाल, पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र राऊत, भूमी उपअधीक्षक विभागाचे देशपांडे, कमलेश चव्हाण, एनचआय विभागाचे वाढरे , आदी प्रामुख्याने उपस्थित होते

  संदीप कांबळे कामठी

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145