Published On : Wed, Jul 10th, 2019

प्रॉपर्टीच्या वादातून बहिणीचा भावावर चाकूने प्राणघातक हल्ला

कामठी:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पिली हवेली चौकात प्रॉपर्टी च्या वादात झालेल्या भांडणात सख्या आईने स्वतःच्या मूलाच्या डोक्यावर लोखंडी वार केले तर बहिणीने चाकूने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना दुपारी 4.45 वाजता घडली असून जख्मि तरुणाचे नाव विजय रवीप्रसाद त्रिपाठी वय 28 वर्षे रा पिली हवेली कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार जख्मि विजय त्रिपाठी हे मूळचे फुटाळा ओली नागपूर येथील राहिवासी असून कामठी येथील पिली हवेली चौकातील एका मुस्लिम समाजातील मुलीशी केलेल्या प्रेमविवाहातून कामठीत वास्तव्यास होते दरम्यान जख्मि विजय हे मूळच्या घराच्या हिस्सा मागण्यासाठी पत्नीसह गेले असता वेळोवेळी झालेला कौटुंबिक वाद हा विकोपाला गेला होता तर याच वादाची पुनरावृत्ती कामठीतील पिली हवेली चौकात झाले असता जख्मि चा भाऊ , आई व दोन बहिणींनी संगनमताने मारझोड करीत आई लता मिश्राने डोक्यावर लोखंडी हातोडीने वार केले तर एका बहिणीने तरुणाच्या छातीच्या डाव्या बाजूला चाकूने वार करून प्राणघातक हल्ला केला असून जख्मि नागपूर च्या मेयो इस्पितळात उपचार घेत आहे.

यासंदर्भात फिर्यादी जख्मि विजय त्रिपाठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भाऊ सतीश उर्फ ऋषी त्रिपाठी, आई लता त्रिपाठी तसेच दोन बहिणी विरुद्ध भादवी कलम 307 अनव्ये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास एपीआय युनूस शेख करीत आहेत.

संदीप कांबळे