| | Contact: 8407908145 |
    Published On : Thu, Aug 9th, 2018

    नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवी उमेश चौबे अनंतात विलीन

    नागपूर : ज्येष्ठ समाजसेवी व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गुरुवारी मोक्षधाम घाट येथे शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    गुरुवारी सकाळपासूनच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गुजरवाडी डालडा कंपनी चौक येथील निवासस्थानी चाहत्यांनी गर्दी केली होती. दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून उमेशबाबू यांचे एकूण कार्य पाहता व त्यांचे समाजासाठीचे योगदान बघता त्यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार व्हावे, अशी विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेच ही विनंती मान्य करीत जिल्हा प्रशासनाला तसे आदेश दिले.