Published On : Tue, Mar 21st, 2017

उल्हासनगरमधील जिवंत जाळलेल्या वडापाव विक्रेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Advertisement

Ulhasnagar_Vadapav_Seller
उल्हासनगर:
सोमवारी उल्हासनगरमध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका वडापाव वाल्याने दुस-या वडापाव वाल्याला जिवंत जाळले होते. आज त्या वडापाव वाल्याचा उपचारा दरम्यान मॄत्यू झाला. नवी मुंबईच्या ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी ८.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आरोपी सुरेश आहुजा अजूनही फरारच आहे. विठ्ठलवाडी पोलीस आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करणार आहेत.

चंदरलाल रामरखियानी असं त्याचं नाव आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील देवानंद फोटो स्टुडिओसमोर चंदरलाल यांचं मुंबई महालक्ष्मी वडापावचा स्टॉल होता. या दुकानासमोरच एका व्यक्तीला स्वत:ची वडापावची गाडी टाकायची होती. धंद्यावर परिणाम होण्याच्या भीतीनं चंदरलाल यानं त्याला विरोध केला. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात समोरच्या व्यक्तीनं महालक्ष्मी वडापाव दुकानात शिरून चंदरलाल याला जिवंत जाळले.

सुरुवातीला सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चंदरलाल याला नंतर ऐरोलीला हलवण्यात आलं होतं. मात्र, त्याचा जीव वाचवण्यात पोलिसांना अपयश आले. व्यावसायिक वादातून एका वडापाव विक्रेत्याने दुसऱ्या वडापाव विक्रेत्याला पेटवून दिलं. यामध्ये दुकान मालक चंदरलाल रामरखियानी १०० टक्के भाजले. घटनेनंतर त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Gold Rate
Saturday 22 March 2025
Gold 24 KT 88,100/-
Gold 22 KT 81,900 /-
Silver / Kg 98,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रामरखियानी यांचं उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळ जम्बो वडापावचं दुकान आहे. मात्र त्यांच्या दुकानाबाहेर सुरेश नामक फेरीवाला वडापावचा व्यवसाय सुरु करणार होता. यावरुन चंदरलाल आणि सुरेश यांच्यात वाद झाला. त्यानंतर सुरेश यांनी रामरखियानी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिंवत जाळण्याचा प्रयत्न केला.

Advertisement
Advertisement