Published On : Tue, Jan 28th, 2025
By Nagpur Today Nagpur News

उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; एसटी भाडेवाढीविरोधात आज राज्यभरात आंदोलन

Advertisement

नागपूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या भाड्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार एसटीच्या भाड्यात १४.९५ टक्के वाढ होणार आहे. ही भाडेवाढ २५ जानेवारीपासून लागू होणार आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य, अतिरिक्त पोलीस वाहतूक महासंचालक आणि परिवहन आयुक्त यांच्यासह प्राधिकरणाच्या अध्यक्षतेखालील समितीने भाडेवाढीला मंजूरी दिली. मात्र या भाडेवाढीनंतर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. अशातच आता एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक संतप्त झाले आहे.

Gold Rate
Mar 25,2026 - Time 11.05Hrs
Gold 24 KT ₹ 1,45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,700 /-
Silver/Kg ₹ 2,37,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

एसटीच्या भाडेवाढीविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. याच भाडेवाढीचा निषेध करत ठाकरे गट आज राज्यभर आंदोलन करणार आहे. काल एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केले होते.

तर आज राज्यभरातील विविध जिल्ह्यात ठाकरे गटाने चक्काजमा आंदोलनाचा इशारा देत रस्त्यावर उतरले आहेत. राज्यातील विविध डेपो बाहेर ठाकरे गटाचे नेते आक्रमक होताना दिसले.

यावेळी त्यांनी एसटीची भाडेवाढ त्वरीत मागे घ्या… अशी घोषणाबाजी करत आपली मागणी लावून धरली. राज्यातील बीड, अमरावती, सोलापूर, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, बुलढाणा यासह विविध भागात ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement