मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. महाविकास आघाडीने एकूण 30 जागांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे महायुतीने केवळ राज्यात 17 जागांवर विजय मिळवला आहे.
यामुळे आता आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीच विजयी होणार असा दावा करण्यात येत आहे. यातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याबाबत वक्तव्य केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामुळेच महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय लढणे धोकादायक असल्याचे राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा डोळ्यासमोर समोर न ठेवता लढणार असल्याचे ठरविले होते. पण महाविकास आघाडीने एकत्रितपणे घेतलेल्या निर्णयाच्या विपरीत वक्तव्य हे संजय राऊत यांनी केल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.