नागपूर : भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र द्वेषी आहे. ते राज्याला लागलेली कीड असल्याची टीका राणे यांनी केली.अकोल्याला जाण्यापूर्वी नितेश राणे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
आरक्षणाच्या मुद्यावरही राणे यांनी भाष्य केले. नाना पटोले, शरद पवार यांची भूमिका ओबीसीतून आरक्षण न देता किंवा दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची आहे मात्र उद्धव ठाकरे यांची याबाबत भूमिका नाही. त्यामुळे कुठेतरी जरांगे पाटील एकटे पडत चालले आहे असेही राणे म्हणाले.
पोलीस विभाग काही अधिकाऱ्यांमुळे भ्रष्ट –
काही पोलीस अधिकाऱ्यामुळे पोलीस विभाग बदनाम होतो आहे. यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव खराब होत आहे. अशा सडक्या आंब्याना त्या पद्धतीचा आम्ही इशारा दिला, असेही राणे म्हणाले.