मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप असणाऱ्या काँग्रेस आमदारांवर पक्षाकडून कारवाईची टांगती तलवार असतानाच यातील दोन आमदारांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आहे.हे आमदार लवकरच शिंदे गटात जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.
हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर अशी मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या काँग्रेस आमदारांची नावे आहेत.
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, सुलभा खोडके, झिशान सिद्दिकी आणि मोहन हंबर्डे यांनी विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करत महायुतीच्या उमेदवारांना मदत केल्याची चर्चा आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या पाचही आमदारांना काँग्रेस पक्ष तिकीट देणार नसल्याने या आमदारांच्या मनात संतापाची भावना आहे.