Published On : Tue, Jul 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात राम मंदिर प्रशासनाची भूमिका; उद्धव ठाकरेंना रामरक्षा पठणाला हिरवा कंदील, घोषणाबाजीला परवानगी नाही

Advertisement

नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात रामरक्षा पठणासाठी परवानगी मागितली असून मंदिर प्रशासनाने त्यास मंजुरी दिली आहे. मात्र, मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची राजकीय घोषणाबाजी, भाषणे किंवा आंदोलनास परवानगी दिली जाणार नसल्याचे राम मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रामनगर राम मंदिराचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी सांगितले की, संजय राऊत यांनी दूरध्वनीवरून रामरक्षा पठणासाठी परवानगी मागितली होती. धार्मिक कार्यक्रम असल्याने मंदिर प्रशासनाने त्यास कोणताही विरोध केला नाही. मात्र, मंदिर परिसराची पवित्रता लक्षात घेऊन राजकीय घोषणाबाजी, भाषणे किंवा कोणत्याही प्रकारचे राजकीय कार्यक्रम करता येणार नाहीत, अशी स्पष्ट सूचना त्यांना देण्यात आली असून राऊत यांनीही त्यास सहमती दर्शवली आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यासोबतच, युवा सेनेकडून कोणतेही आंदोलन किंवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्यास त्यासाठी संबंधित प्रशासनाची आवश्यक परवानगी घेण्याच्या सूचनाही मंदिर प्रशासनाने दिल्या आहेत.

दरम्यान, २२ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राम मंदिरालगत असलेल्या एनआयटीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ५६ कुंडीय महायज्ञाबाबत रवी वाघमारे यांनी स्पष्ट केले की, तो परिसर मंदिराच्या मालकीचा नसल्याने त्या कार्यक्रमासाठी मंदिर प्रशासनाच्या परवानगीची आवश्यकता नाही.

Advertisement

मंदिर प्रशासनाच्या या भूमिकेमुळे धार्मिक कार्यक्रम आणि राजकीय उपक्रम यांच्यात स्पष्ट सीमा राखण्याचा संदेश देण्यात आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.