Advertisement
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचेसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा हे देखील उपस्थित होते.