Published On : Mon, Jun 24th, 2019

दोन वर्षासाठी हद्दपार आरोपीस अटक

कामठी -नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील एका सराईत गुन्हेगारास डिसीपी हर्ष पोद्दार यांनी 5 फेब्रुवारी 2019 ला पुढील दोन वर्षापर्यंत नागपूर शहर/ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतून हद्दपार करण्यात आले होते.

हा आरोपी भरतवाडा रोड नागपूर येथील कीर्ती रेस्टरेंट चौकात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच गुन्हे शाखा विभागाच्या पथकाने वेळीच धाड घातली असता आरोपीने पळ काढला असता पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.

Advertisement

तेव्हा हद्दपार असूनही विनापरवानगीने वावरत असल्या वरून त्याविरुद्ध भादवी कलम 142 अनव्ये गुन्हा नोंदवीत अटक करण्यात आले. अटक आरोपीचे नाव गणेश प्रीतमलाल बोरकर वय 29 वर्षे रा भांडेवाडी नागपूर असे आहे.ही कारवाही काल सायंकाळी साडे सहा वाजता करण्यात आली.

ही यशस्वी कारवाही डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनार्थ गुन्हे शाखा विभागाचे नामदेव टेकाम, अजय बघेल आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement