Published On : Fri, Jul 5th, 2019

दोन चोरट्यास अटक, 5 लक्ष 3 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नवीन कामठी पोलीस स्टेशन चे डी बी स्कॉड काल 4 जुलै ला सायंकाळी 6 वाजेदरम्यान गस्तीवर असताना कळमना रोड वरील कॅनल जवळ दोन चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेले विविध महागडे कंपनीचे 25 मोबाईल व दोन दुचाकी असे एकूण 5 लक्ष 3 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अटक चोरट्यांचे नावे नितीन रामाजी घुडके वय 40 वर्षे रा शांती नगर नागपूर तसेच सिद्धार्थ उर्फ सिद्धू उर्फ मान्या शिवदास रामटेके वय 21 वर्षे रा.जुना बगडगंज नागपूर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेरी गावातील रोशन बळीराम वंजारी नामक व्यक्तीची 28 जून ला रात्री 11 ते 29 जून च्या सकाळी 6 दरम्यान दुचाकी क्र एम एच 40 सी 4297 चोरी झाल्याची घटना घडली असता यासंदर्भात फिर्यादी रोशन वंजारी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिस शोधकामी लागले असता 4 जुलै ला सायंकाळी 6 दरम्यान कळमना रोड वरील मार्गावर गस्त करीत असता दोन इसम वेगवेगळ्या दुचाकीवर जाताना दिसले त्यात एकाच्या दुचाकीचे मागचे नंबर प्लेट खोडलेले होते तर एकाच्या दुचाकीला नंबर प्लेट दिसून न आल्याने या दोघांना पोलिसांनी थांबवून विचारपूस करीत दुचाकींची झडती घेतली

असता त्यातील एम पी 28 एम जे 9508 क्रमांकाच्या डिक्कीतील टेलिफोन एक्सचेंज येथील एका मोबाईल दुकानातून चोरीस गेलेले विविध महागडे कंपणीचे 25 मोबाईल दिसून आले यासंदर्भात दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेत विचारपूस केले असता दोघांनी दुचाकी सह मोबाईल चोरी केल्याचे कबुली दिली असून यांच्याकडून नेरीतून चोरीस गेलेली दुचाकी क्र एम एच 40 सी 4297 किमती 18 हजार रुपये तसेच कळमना रोड मधून चोरीस गेलेली एम पी 28 एम जे 9508 किमती 20 हजार रुपये व 25 महागडे मोबाईल असे एकूण 5 लक्ष 3 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात येत आरोपी नितीन रामाजी घुडके वय 40 वर्षे रा शांती नगर नागपूर, सिद्धार्थ रामटेके वय 21 वर्षे रा जुना बगडगंज नागपूर विरुद्ध गुन्हा नोंदवीत अटक करण्यात आले.

ही यशस्वी कारवाही डीसीपी हर्ष पोद्दार , एसीपी राजेश परदेसी यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बकाल, दुय्यम पोलीस निरीक्षक आर आर पाल, डी बी स्कॉड चे पप्पू यादव, मंगेश लांजेवार,मंगेश वाघ, राजा टाकळीकर, सतीश ठाकूर, राजा टाकळीकर, ललित शेंडे आदींनी मोलाची भूमिका स्वीकारली.

संदीप कांबळे कामठी