Published On : Fri, Jul 5th, 2019

लोहमार्ग पोलिसावर दगडफेक

Advertisement

अजनी स्थानकावरील घटना

नागपूर: एका गुन्हेगाराने लोहमार्ग पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल सुशिल पांडे यांच्यावर दगडफेक केली. या घटनेत त्यांच्या डोक्यावर दगड लागून ते जखमी झाले. ही घटना आज शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास अजनी रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सोहेब खान बब्बु खान (३७, रा. अंबाझरी टेकडी) असे दगडफेक करणाºया आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली असून शनिवारी न्यायालयात हजर केले जाईल. सुशिल पांडे हे नागपूर लोहमार्ग ठाण्यात नेमणुकीस आहेत. शुक्रवारी त्यांची ड्यूटी अजनी रेल्वे स्थानकावर होती.

ड्यूटीवर हजर झाल्यानंतर त्यांनी स्टेशनच्या आत विनातिकीट प्रवेश करून आराम करणाºयांना त्यांनी बाहेर केले. दरम्यान सोहेब खान हा सुध्दा आराम करीत होता. त्यालाही उठविले. सोहेब उठून बाहेर गेला पांडे यांना काही कळण्याच्या आधीच त्यांच्यावर दगडफेक केली. पांडे सकर्त होणार तत्पूर्वी त्यांच्या डोक्यावर एक दगड लागला अन् ते जखमी झाले. जवळच असलेले आॅटोचालक धाऊन गेले.

पांडे यांनी त्याच अवस्थेत सोहेबचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याला नागपूर लोहमार्ग ठाण्यात आणुन चौकशी करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार सोहेब हा रेकार्डवरील गुन्हेगार आहे. त्याला पत्नी, मुले आणि आई वडिल आहेत. तो अंबाझरी टेकडी परिसरात राहतो. मात्र, बरेचदा तो अजनी रेल्वे स्थानकावरच असतो. भिक्षेकरी आणि निराधार लोक फलाटावर विनाकारण कब्जा करतात. त्यामुळे प्रवाशांना अडचन होते. शिवाय प्रवाशांचे सामानची चोरी जाते. त्यामुळे पांडे अशा लोकांना स्टेशन बाहेर करीत असताान उपरोक्त घटना घडली. वृत्त लिहेपर्यंत सोहेब विरूध्द कागदोपत्री कारवाई सुरू होती.

Advertisement
Advertisement