Published On : Tue, Sep 24th, 2019

रमानगर च्या दोन चोरट्यांना अटक

कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुर्गा चौकातील दुर्गा हार्डवेअर दुकाणातून अज्ञात चोरट्यानि तीन दिवसांपूर्वी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अवैधरित्या दुकानात प्रवेश करून दुकानातील 500 रुपयाचे साहित्य तसेच नगदी 1800 रुपये असा एकूण 2300 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली

असून यासंदर्भात जुनी कामठी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 457, 380 अनव्ये गुन्हा नोंदवून तपासाला गती दिली असता या गुन्हयातील चोरट्याचा शोध लावण्यात जुनी कामठी पोलिसांना यश प्राप्त झाले असून यातील दोन चोरट्याना अटक करण्यात आले.अटक आरोपी चे नाव विनोद बांबोर्डे वय 38 वर्षे, मनोज भैसारे वय 28 वर्षे दोन्ही राहणार रमानगर कामठी असे आहे. यांच्याकडून चोरीस गेलेले 500 रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आले.

ही यशस्स्वी कारवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांच्या मार्गदर्शनार्थ डी बी स्कॉड चे दिलीप ढगे, धर्मेंद्र राऊत, महेश कठाने यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

संदीप कांबळे कामठी