Published On : Sat, Sep 29th, 2018

नागपूर पोलिसांकडून दोन कुंटणखान्यावर छापे

Sex Racket

नागपूर : गुन्हे शाखा आणि सीताबर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा मारून चार वारांगना पकडल्या. त्यांच्याकडून देहविक्रय करवून घेणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली.पहिली कारवाई पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशालीनगरात झाली. हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील रहिवासी सुनील वानखेडे हा गेल्या काही दिवसांपासून स्वत:च्या घरातच कुंटणखाना चालवित होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला त्याची माहिती कळाल्यानंतर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) कारवाईचा सापळा रचला. शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास पोलिसांनी सुनील वानखेडेकडे एक ग्राहक पाठविला. त्याने तीन हजार रुपये घेऊन त्याला दोन वारांगना दाखवल्या.

त्यातील एकीला घेऊन ग्राहक वानखेडेच्या सदनिकेत गेले. ठरल्याप्रमाणे एसएसबीचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक अनुपमा जगताप यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने तेथे छापा मारला. यावेळी ग्राहकासोबत एक तर कुंटणखाना चालविणाºया सुनीलच्या सोबत असलेली दुसरी वारांगना पोलिसांच्या हाती लागली. सुनील पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे त्या वारांगनांनी पोलिसांनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी सुनीलविरुद्ध पिटा कायद्यानुसार पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दुसरी कारवाई सीताबर्डीतील बहुचर्चित पकोडावाला गल्लीत झाली. नूतन लॉजमध्ये सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास छापा मारून लॉजमालक शैलेंद्र कामडी (वय ३०), मीना कामडी (वय ५५, रा. पकोडावाला गल्ली) तसेच रमेश राऊत (वय ३६, रा. पारडी) या तिघांना अटक केली. नूतन लॉजमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांना मिळाली होती.


त्यावरून पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक आयुक्त मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी कारवाईचा सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लॉजमालक शैलेंद्र कामडीकडे एक ग्राहक पाठविण्यात आले. १५०० रुपयांच्या बदल्यात कामडीने एक वारांगना सोबत देऊन लॉजची रूमही उपलब्ध करून दिली. काही वेळेनंतर सीताबर्डीचे पोलीस उपानिरीक्षक ए. स्थूल आणि त्यांच्या सहकाºयांनी तेथे छापा मारून वारांगनेला ताब्यात घेतले. तिच्या माहितीवरून शैलेंद्र आणि मीना कामडी तसेच रमेश राऊत या तिघांना पिटा कायद्यानुसार अटक केली. १४ दिवसांत कुंटणखान्यावर झालेली ही ९ वी कारवाई आहे.