Published On : Mon, Jul 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात फरार सराईत घरफोड्या चोराच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा; २.५० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

Advertisement

नागपूर : नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत सुमारे २.५० लाख रुपये किमतीचे २३.१० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या प्रकरणात चोरीचा मुद्देमाल विकणारा एक आरोपी आणि तो खरेदी करणाऱ्या सराफा व्यावसायिकाची भूमिका समोर आली असून, मुख्य आरोपी हर्ष उर्फ एक्का महेंद्र रामटेके हा अद्याप फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष पथक नियुक्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पुणे येथील प्रीती मंगेश काटेकर यांनी तक्रार दिली होती. २१ ते २२ मे २०२६ दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या भाड्याच्या घरात प्रवेश करून सुमारे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले होते.

Gold Rate
July 20 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 42,400 /-
Gold 22 KT ₹ 1,32,100 /-
Silver/Kg ₹ 2,20,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान पोलिस हवालदार मनोज टेकाम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही चोरी हर्ष उर्फ एक्का रामटेके याने केल्याचे निष्पन्न झाले. चोरीचे सोन्याचे दागिने त्याने अर्जुन प्रभू सोलंकी (वय २५, आराधना नगर, भांडेवाडी) याच्याकडे विक्रीसाठी दिले होते.

पोलिसांनी अर्जुन सोलंकी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हे दागिने उमरेड येथील इतवारी पेठेतील आशीर्वाद ज्वेलर्सचे संचालक संदीप भास्कर गुरुलवार यांना विकल्याची कबुली दिली.

Advertisement

चौकशीदरम्यान आणखी एका घरफोडीचा उलगडा झाला. २९ जून २०२६ रोजी राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॉलनी, खामला येथे झालेल्या घरफोडीत चोरीला गेलेले सोन्याचे ब्रेसलेट व इतर दागिनेही हर्षने अर्जुनच्या माध्यमातून त्याच सराफा व्यावसायिकाला विकल्याचे समोर आले.

यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोन्ही गुन्ह्यांतील २३.१० ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे २.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

मुख्य आरोपी सराईत घरफोड्या-
तपासात हर्ष उर्फ एक्का महेंद्र रामटेके हा गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील रहिवासी असून तो सराईत घरफोड्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो नागपुरात येऊन ओयो हॉटेलमध्ये मुक्काम करत विविध भागांत संधी साधून घरफोड्या करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याविरुद्ध नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत.

मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी छापेमारी करत आहेत. आरोपीला अटक झाल्यानंतर त्याच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, संयुक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल, सहाय्यक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१चे पोलिस निरीक्षक प्रशांत ठवरे आणि त्यांच्या पथकाने केली. यात पोलिस हवालदार मनोज टेकाम, रवी अहिर, प्रीतम यादव, स्वप्निल खोडके, शरद चांभारे, अजमत शेख, नितीन बोपुलकर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Advertisement
हादसे में सड़क किनारे खड़े 65 वर्षीय व्यक्ति की मौत

हादसे में सड़क किनारे खड़े 65 वर्षीय व्यक्ति की मौत

सोनम वांगचुक समर्थन में उल्हासनगर में प्रदर्शन #maharashtranews #ulhasnagar #newsupdate #maharashtra

सोनम वांगचुक समर्थन में उल्हासनगर में प्रदर्शन #maharashtranews #ulhasnagar #newsupdate #maharashtra

छात्र मुद्दों पर महाविकास आघाड़ी का ज्ञापन #maharashtranews #satara #newsupdate #maharashtra

छात्र मुद्दों पर महाविकास आघाड़ी का ज्ञापन #maharashtranews #satara #newsupdate #maharashtra

पुणे में सीजेपी समर्थन में छात्रों का प्रदर्शन #maharashtranews #pune #newsupdate #maharashtra

पुणे में सीजेपी समर्थन में छात्रों का प्रदर्शन #maharashtranews #pune #newsupdate #maharashtra

खोपोली में वारिश के बीच महाधरना प्रदर्शन #maharashtranews #raigad #newsupdate #maharashtra

खोपोली में वारिश के बीच महाधरना प्रदर्शन #maharashtranews #raigad #newsupdate #maharashtra

पचास साल बाद राजस्व विभाग के नए नियम।

पचास साल बाद राजस्व विभाग के नए नियम।

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges