या घटनेची माहिती मिळताच सुगत नगर अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले आहे. या आगीचे करा कारण अद्यापही अस्पष्ट विजय अमेसर (MH49 00432 फोर्ड कंपनी)ची कार आणि रोहित मुखानी यांची (MH49CD 0370) जीप कंपनीची ही कार आहे.
‘नागपूर टुडे’ टीमने अमृत फार्म्सच्या व्यवस्थापकांशी आगी संदर्भात संवाद साधला. यावर ते म्हणाले की, नागपूरमध्ये जास्त तापमानामुळे आजूबाजूच्या कोरड्या झुडुपांना आग लागली. बहुतेक ही आग जळत्या सिगरेटमुळे लागल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान या आगीत विजय अमेसर यांचे 4 लाखांचे आणि मुखानी यांचे 20 लाखांचे नुकसान झाले आहे.