Published On : Thu, Jun 4th, 2020

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन बाईक सवार म्रुत्यु

चारचाकी वाहन चालक धडक देवून पसार

रामटेक – पारशिवनी तालुक्यातील गाव आमडी येथील इंडियन पेट्रोल पंप जवळ ३ जून रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन बाईक सवार म्रुत्यु झाले. पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार व परिस्थिती नुसार हकीकत अशी आहे की, दोन बाईकसवार मोटारसायकल क्र.एम.एच.४९ ए एफ ५६०५ या बाईकने मनसर नागपूर रोडवरुन दुचाकी वाहनाने चुकीच्या बाजूने प्रवास करत होते.

त्यावेळी पाऊस सुरू असल्यामुळे परिसर सुनसान होता. हीच संधी पाहून अज्ञात चारचाकी वाहन चालक धडक देवून पसार झाला.त्यात अदीर रमेश तांबे वय ३२ रा.पारडी,नागपूर हा जागीच मरण पावला व दुसरा धिरज शाहू रा.कपील नगर नागपूर हा गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी मेओ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा धिरज हा उपचारादरम्यान म्रुत्यु पावला.या घटनेत एक अनोळखी महिला जखमी झाल्याची माहिती आहे.

ही घटना पारशिवनी पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा एक व्यक्ती जागीच म्रुत्यु झाल्याची जाणीव झाली.तर दुसरा गंभीर जखमी होता.पंचनामा करून म्रुत्यु देह उत्तरीय तपासणी साठी मेओ हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहे.