Published On : Fri, Aug 16th, 2019

दुचाकी सह जुगार खेळताना बारा आरोपीना अटक

कन्हान ता 15 कन्हान पोलिस स्टेशन च्या हद्दीत जुनिकामठी येथे एका सार्वजनिक जागेवर टार्च व मेणबती चे साहयाने जुगार खेळत असतानी पोलिसाना गुप्त माहिती वरून कन्हान पोलिस स्टेशनचे ठाणेदार चंन्द्रकात काळे व स्थानिक गुन्हे शिखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मीप्रसाद दुबे यानी संयुक्त कार्यवाही करत गावात जुगार अडड्यावर पोलिसानी स्वातंत्र्य दिनाचे पुर्व संध्या काळी बुधवार रोजी रात्री साडेसात वाजता दरम्यान धाड टाकुन बारा जुगारयाना अटक केली व तिस हजार आठसे रूपये रोख सह एक लाख एकसठ हजार तिनसे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .

कन्हान पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक चंद्रकांत काळे व गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक लक्ष्मीप्रसाद दुबे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पवार , जॉन, सुधिर चव्हाण, मकेश वाधाङे, संजीव बदोरिया सह संपुर्ण टिम यानी जुगार अड्डयावर छापा टाकला असता १) विजय लांजेवार वय ३० , राहणार जुनिकामठी , २) गौतम मेक्षाम वय ३० राहणार प्रबुद्ध नगर नया गोदाम कामठी,३)निखिलेश वासनिक वय २९ राहणार प्रबुद्ध नगर नया गोदाम कामठी , ४)आजाद ढोके वय १९ राहणार प्रबुद्ध नगर नयागोदाम कामठी ,५) सातिश हुमणे वय २७ राहणार प्रबुद्ध नगर नयागोदाम कामठी ,६)शुभम भाईमारे वय २५ राहणार न्युयेरखेडा वार्ड नं एक कामठी , ७) गुलाम रसुल अब्दुल गुलाम वय ३२ राहणार जयभिम चौक कलमना रोड कामठी , ८) सरफराज अहमद क्या ३२ राहणार बुनकर कॉलोनी कामठी, ९) सैययद इमरान वय ३३ कादर झंडा कामठी , १०) शहनवाज अहमद वय २२ शहणार बुनकर कालोनी कामठी ,१२) दिलिप कोसारे वय ४८ राहणार प्रबुध्द नगर नयागोदाम कामठी तसेच१२) निलेश नानोटे वय ३२ राहणार प्रबुद्ध नगर नयागोदाम कामठी या बाराही आरोपीना जुगार खेळताना अटक करून बावन पत्ते रोख ३०,८००/-आणी दहा मोबाईल किमत ७५,५००/- हजार रूपये दुचाकी एम एच ४० बिःटी, ०३४१ हिरो टयुड ५५,०००/- असा एकुण १,६१,३०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक चंन्दकांत काळे यांचा मार्गदर्शनात सहाय्यक पुलिस निरिक्षक प्रमोद पवार पुढील तपास करीत आहे.

शहर प्रतिनिधी कमल यादव कन्हानपाराशिवनी