Published On : Sat, Apr 8th, 2017

कडक शिस्तीच्या तुकाराम मुढेंच्या कारभाराचा झटका महापौरांना

Advertisement

Tukaram-mundhe
पुणे:
कडक शिस्तीचे तुकाराम मुंढे अधिकच चर्चेत आहे. पुण्यातील पीएमपीएमएलचे अध्यक्ष असलेले तुकाराम मुंढे यांच्या कारभाराचा झटका आज पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनाही बसला. महापालिकेतील विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणूक आज होती. त्यासाठी तुकाराम मुंढे यांची पीठासीन आधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी महापौर, उपमहापौर, सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित असतात. अशी महापालिकेची परंपरा आहे.

तुकाराम मुंढे यांनी मात्र समीतीचे सदस्य असलेल्या नगरसेवकांशिवाय इतरांना उपस्थित राहण्यास मनाई केली. त्याला नगरसेवकांनी हरकत घेतली. त्यानंतर महापौर आणि गटनेत्यांना उपस्थित राहण्यास मुंढे यांनी परवानगी दिली. मात्र, या सर्वांना बाजूला एका कोपर्‍यात बसावं लागेल, असं मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेत येऊनही महापौर मुक्ता टिळक यांनी या निवडणुकीला जायचं टाळलं.

विषय समित्यांचे सदस्य असलेल्या नगरसेवकांना मुंढे यांनी ओळखपत्र मागीतले. त्यावर काही सदस्यांनी आक्षेप घेत मुंडे यांनाही त्यांच्या ओळखपत्राची मागणी केली. मुंढे यांनी नगरसेवक आणि महापौरांना दिलेल्या या वागणुकीवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महापौर मुक्ता टिळक यांनी ही निवडणुकीला न गेल्याचं मान्य केलं. मात्र, त्यामागे मुंढे यांनी केलेली नो एन्ट्रीचं कारण नाही. तर, इतर कारण असल्याचं त्यांनी म्हटलं. तर नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी इच्छा व्यक्त केली की तुकाराम मुंढेंना पुणे महापालिकेचे आयुक्त करा, जेणेकरुन पुण्यात देखील पारदर्शक कारभार होईल.