Published On : Mon, Aug 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

महासत्ता व्हायचे असेल तर विवेकशील समाज घडवावा लागेल; नागपुरात तुकाराम मुंढेंचे परखड मत

Advertisement

नागपूर : विकसित भारत आणि २०४७ पर्यंत महासत्ता होण्याच्या ध्येयाबाबत राज्याचे वरिष्ठ सनदी अधिकारी तथा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. केवळ आर्थिक विकासाच्या जोरावर भारत महासत्ता होऊ शकत नाही. त्यासाठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकशीलता आणि नैतिक मूल्येही तितकीच मजबूत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्टच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती वितरण व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी अनेक समकालीन विषयांवर भाष्य केले.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

समाजात बहुसंख्यांचे मत म्हणजेच सत्य असे नसते. समाजहित आणि नैतिकतेच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला ठामपणे विरोध करण्याचे धैर्य प्रत्येक नागरिकात असले पाहिजे. विशेषतः झुंडशाहीच्या वाढत्या प्रवृत्तीला रोखण्यासाठी नव्या पिढीने विवेक आणि चिकित्सक विचारसरणी स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजमाध्यमांच्या प्रभावावर भाष्य करताना मुंढे म्हणाले, आजचा संघर्ष शस्त्रांचा नसून विचारांचा आहे. सोशल मीडियावरून दिशाभूल करणारी माहिती मोठ्या प्रमाणात पसरवली जात आहे. त्यामुळे कोणतीही माहिती, व्हिडिओ किंवा रील आंधळेपणाने स्वीकारू नये. त्यामागील स्रोत, उद्देश आणि सत्यता तपासण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे.

Advertisement

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पदवीपेक्षा कौशल्य अधिक महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. बदलत्या काळात सातत्याने नवे शिकण्याची तयारी आणि कौशल्यविकास यामुळेच यशस्वी करिअर घडते, असे त्यांनी नमूद केले.

तसेच, समाजमाध्यमांवरील अल्गोरिदममुळे व्यक्तीला त्याच्या आवडीचेच विचार सतत दिसतात. त्यामुळे वेगवेगळे दृष्टिकोन समजून घेण्याची क्षमता कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी वैचारिकदृष्ट्या सक्षम, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला आणि जबाबदार समाज घडविणे ही काळाची गरज असल्याचा संदेश त्यांनी दिला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.