Published On : Mon, Aug 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुमारी माता; लग्नास नकार देत आरोपी फरार

Advertisement

नागपूर : सोशल मीडियावर झालेली ओळख एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसाठी आयुष्यभराची वेदना ठरली. फेसबुकवरून झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत तरुणाने तिचे लैंगिक शोषण केले. गर्भधारणा झाल्यानंतर आरोपीने पाठ फिरवली. मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीची ओळख फेसबुकवरून मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील एका तरुणाशी झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर मुलगी त्याला भेटण्यासाठी बालाघाटला गेली. त्यावेळी लग्न करण्याचे आश्वासन देत आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने संपर्क तोडत फोनही बंद केला.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काही महिन्यांनी मुलगी गर्भवती असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. सामाजिक बदनामीच्या भीतीने त्यांनी हा प्रकार दडपून ठेवला. जुलै महिन्यात प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिने एका बाळाला जन्म दिला. मात्र, रुग्णालयात दाखल करताना तिचे खरे वय लपवून जास्त वय सांगितल्याची बाबही समोर आली आहे.

प्रसूतीनंतर नवजात बालकाला दुसऱ्या कुटुंबाकडे देण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर महिला व बालकल्याण समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. चौकशीनंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीसह संबंधित सर्व बाबींचा तपास सुरू आहे.

Advertisement

दरम्यान, बाळाची विक्री झाल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, अपत्य नसलेल्या एका कुटुंबाने त्या बालकाचे संगोपन करण्याची तयारी दर्शविल्याचे समोर आले आहे. आता या संपूर्ण प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.