Published On : Fri, Jul 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

तुकाराम मुंडेंना मुंबई हायकोर्टाचा झटका; मंत्रालयाच्या कँटीनप्रकरणी एफडीएला न्यायालयाचे कडक निर्देश

Advertisement

मुंबई-मंत्रालयाच्या कँटीनमधील स्वच्छतेच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि त्याचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना कोणालाही विशेष वागणूक देता येणार नाही, असा स्पष्ट इशारा न्यायालयाने दिला.

या प्रकरणात एफडीएने न्यायालयात मंत्रालयाच्या कँटीनमध्ये कोणतेही कीटक आढळले नसल्याचे सांगितले होते. मात्र, न्यायालयाने स्वतंत्र तपासणीचे आदेश दिल्यानंतर चार वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. या पाहणीत कँटीनमधील अनेक त्रुटी उघड झाल्या.

Gold Rate
July 30 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,100 /-
Gold 22 KT ₹ 1,32,800 /-
Silver/Kg ₹ 2,18,100/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तपासणीदरम्यान कँटीनमध्ये माश्यांचा वावर आढळला. तसेच अन्न तयार करताना वापरले जाणारे चाकू गंजलेले आणि जीर्ण अवस्थेत असल्याचे समोर आले. याशिवाय फ्रिजमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, तुटलेल्या फरशा, गळती करणारे पाण्याचे नळ आणि निकृष्ट ड्रेनेज व्यवस्थेमुळे अस्वच्छ वातावरणात भांडी धुतली जात असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले.

हा अहवाल न्यायालयात सादर होताच न्यायमूर्तींनी एफडीएच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. फ्रिजचे छायाचित्र पाहिल्यानंतर न्यायालयाने, “यापेक्षा चप्पल ठेवण्याचा स्टँड अधिक स्वच्छ दिसतो,” अशी कठोर टिप्पणी करत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

Advertisement

सुनावणीदरम्यान न्यायालयाने एफडीएसमोर दोन पर्याय ठेवले. मंत्रालयाच्या कँटीनचा परवाना तातडीने निलंबित करावा किंवा केळ्यांवर काळे डाग असल्याच्या कारणावरून यापूर्वी रद्द केलेल्या परवान्याचा निर्णय मागे घ्यावा. कायद्याचा वापर करताना दुहेरी निकष ठेवता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने पुढे असेही नमूद केले की, कोणत्याही आस्थापनात त्रुटी आढळल्यास प्रथम नोटीस देऊन त्या दूर करण्याची संधी देणे अपेक्षित आहे. थेट परवाना रद्द करण्याऐवजी सुधारणा करण्याची संधी देणे ही न्याय्य भूमिका असल्याचे न्यायालयाने सांगितले.

एफडीएचे काम महत्त्वाचे असल्याचे मान्य करतानाच, सर्वांवर समान निकष लागू केले गेले पाहिजेत, असा स्पष्ट संदेश न्यायालयाने दिला. या प्रकरणी एफडीएच्या अधिकाऱ्यांना सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील सुनावणीत न्यायालय या प्रकरणावर पुढील निर्णय घेणार आहे.

Advertisement
सावनेर के बोरुजवाड़ा में युवक ने फांसी लगाकर की आत्महत्या #nagpurnews #nagpur #crimenews #latestnews

सावनेर के बोरुजवाड़ा में युवक ने फांसी लगाकर की आत्महत्या #nagpurnews #nagpur...

भिवंडी हादसे पर मंत्री गिरीश महाजन मौके पर #maharashtranews  #bhiwandi #newsupdate #maharashtra

भिवंडी हादसे पर मंत्री गिरीश महाजन मौके पर #maharashtranews #bhiwandi #newsupdate #maharashtra

परिणय फुके का कांग्रेस पर तीखा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurnews #vidarbha

परिणय फुके का कांग्रेस पर तीखा हमला #vidarbhanews #nagpur #newsupdate #nagpurnews #vidarbha

ड्रग्स तस्करी के खिलाफ पुलिस की थंडर स्ट्राइक #vidarbhanews #nagpur #crimenews #nagpurnews

ड्रग्स तस्करी के खिलाफ पुलिस की थंडर स्ट्राइक #vidarbhanews #nagpur #crimenews #nagpurnews

पोस्टमार्टम कक्ष में भरा पानी, व्यवस्था पर सवाल #maharashtranews #jalgoan #maharashtra #newsupdate

पोस्टमार्टम कक्ष में भरा पानी, व्यवस्था पर सवाल #maharashtranews #jalgoan #maharashtra #newsupdate

बारिश से नाले का पानी घरों में घुसा #vidarbhanews  #amravati #newsupdate #maharashtra #vidarbha

बारिश से नाले का पानी घरों में घुसा #vidarbhanews #amravati #newsupdate #maharashtra...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges