Published On : Fri, Jul 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

शेगावच्या प्रसिद्ध पेढ्यांमध्ये भेसळ; नागपूर प्रयोगशाळेच्या अहवालाने शिक्कामोर्तब

Advertisement

बुलढाणा – शेगावच्या प्रसिद्ध पेढ्यांमध्ये भेसळ झाल्याचे नागपूर येथील अन्न प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. मंदिर परिसरातील दोन पेढा विक्री केंद्रांमधून जप्त करण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये नियमांचे उल्लंघन आढळून आले असून संबंधित विक्रेत्यांवर परवाना निलंबनासह न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया अन्न व औषध प्रशासनाने सुरू केली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या महिन्यात शेगाव मंदिर परिसरातील दोन पेढा विक्री केंद्रांवर छापे टाकून सुमारे २५ किलो पेढे जप्त केले होते. या पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अहवालात दोन्ही नमुने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे निष्पन्न झाले.

Gold Rate
Sept 16,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,400 /-
Gold 22 KT ₹ 1,41,400 /-
Silver/Kg ₹ 2,33,000/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, एका दुकानातील पेढ्यांमध्ये दुधाऐवजी पामतेल (फॉरेन फॅट) वापरण्यात आल्याचे आढळले. दुधावर आधारित पेढ्यांमध्ये अशा प्रकारच्या चरबीचा वापर नियमानुसार मान्य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तर दुसऱ्या दुकानातील नमुन्यात कृत्रिम खाद्यरंगाचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे समोर आले.

राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळीविरोधात विशेष मोहीम सुरू केली असून, त्याच मोहिमेअंतर्गत शेगावमध्ये ही कारवाई करण्यात आली होती. आता संबंधित विक्रेत्यांविरोधात परवाना निलंबन, दंडात्मक कारवाई आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.