Published On : Tue, Jun 23rd, 2020

तुकाराम मुंढेंनी संयम दाखविला, नगरसेवकांनी धार केली कमी ..!

शनिवारचा अनुभव पाहता नगरसेवकांनी आज व्यक्तीगत टीका करणे टाळले

नागपूर : महानगरपालिकेची सभा आज दुपारी 1 वाजता येथील कविवर्य सुरेश भट सभागृह सुरू झाली. हो-नाही करता करता आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहात आले.

Advertisement

आजही सर्व नगरसेवक यांच्यावर उलटले. विविध आरोप केले. पण शनिवारी, 20 जूनला होती, तेवढी धार आज नव्हती. आयुक्त मुंढे यांनीही आज आपल्या संयमाचा परिचय दिला.

मुंढे यांच्यात मी पणा भरला आहे, ते नगरसेवकांचे फोन घेत नाही, मनमानी करतात, नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना सन्मान देत नाही, विलगिकरण केंद्र आणि कंटेंनमेंट झोन मध्ये पाणी आणि स्वछतेच्या देखील सुविधा केलेल्या नव्हत्या आणि असेच अनेक आरोप नगरसेवकांनी आयुक्तांवर केले.

नगरसेवक नितीन साठवणे यांच्यावर आयुक्तांनी जो गुन्हा दाखल केला, त्याचा सर्व नगरसेवकांनी निषेध केला. साठवणे यांच्यावरील आरोप मागे घेण्याची मागणी सर्व नगरसेवकांनी केली.

शनिवारचा अनुभव पाहता नगरसेवकांनी आज व्यक्तीगत टीका करणे टाळले. कोरोनाच्या लढ्यात मुंढे यांनी केलेल्या कार्याचे सर्वांनी कौतुक केले. पण आयुक्तांना निशाणा बनविलेच. सर्व जग एकत्रितपणे कोरोना सामना करत असताना नागपुरात मात्र चित्र उलटे होते.

येथे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी वेगवेगळे काम करत होते. यापूर्वी नागपुरात असे कधीच घडले नसल्याचे ही नगरसेवकांनी नमूद केले. आता आयुक्त मुंढे नगरसेवकांना काय उत्तर देणार, याची प्रतीक्षा सभागृहाला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement