Published On : Wed, Aug 1st, 2018

एमआयडीसीचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न करा – उद्योगमंत्री सुभाष देसाई

Advertisement

मुंबई: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या विभागाचा नावलौकिक वाढवण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करावेत, उद्योगस्नेही धोरण अवलंबून महाराष्ट्राला प्रगतीपथावर कायम अग्रस्थानी ठेवावे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ५६ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महामंडळ कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीमध्ये वाढ करून आता दहा लाखापर्यंत ग्रॅच्युटी देण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी जाहीर केले.

यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला. मॅग्नेटिक महाराष्ट्रमुळे राज्यात गुंतवणूक वाढली असून राज्याच्या प्रगतीसाठी नवनवे तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची सूचना मान्यवरांनी यावेळी दिली.

यावेळी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ, सहमुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा, कैलास जाधव, एमआयडीसी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल पेडणेकर, एमआयडीसी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डी. बी. माळी हेमंत संखे आदी उपस्थित होते. यावेळी एमआयसीमधील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.