Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Aug 18th, 2018

  नागपूर-वर्धा मार्गावर डोंगरगावात स्कूलबसला ट्रकची धडक

  नागपूर : नागपूर-वर्धा मार्गावर एका स्कूल बसला ट्रकने दिलेल्या धडकेत बसच्या चालकासह, बसमध्ये असलेल्या दोन शिक्षिका,व पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत.हा अपघात शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथे घडला.

  प्राप्त माहितीनुसार घोटी येथील गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूल या शाळेची स्कूलबस क्र .एम.एच.३४ बी.बी.८३५८ ने विद्यार्थ्यांना घरी सोडण्याकरिता डोंगरगावं येथून वळण घेऊन नागपूरच्या दिशेने वळताना त्या बसमागून नागपूरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रॅक क्र . एम.पी.०७ एच.बी. ८६५० ने स्कूलबसला जोरदार धडक दिली यामुळे ती समोर असणाºया दुसºया ट्रेलरच्या मागच्या बाजूला जाऊन धडकली.

  यात बसच्या समोरच्या भागाची मोडतोड झाली. बसने ट्रेलरला धडक दिल्याने बसचालक अल्ताफ अयुबखान पठाण ( ३२), शाळेतील शिक्षका नीता हर्ष शर्मा (४४)रा मनीषनगर नागपूर, पूजा सचिन फुलझेले (रा. बेलतरोडी) पाच विद्यार्थी, एक विद्यार्थिनी असे नऊ जण जखमी झाले.

  हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहचले व या सर्व जखमींना नागपूर येथील एका खासगी रु ग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. त्या सर्वांची प्रकृती बरी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात आणखी एका कारचे सुद्धा नुकसान झाले ही कार क्र . एम.एच. एफ ०९०६ ट्रक च्या मागे होती व नागपूर कडेच जात होती अचानक समोर ट्रकने बसला धडक दिली .कारचालकाने तात्काळ ब्रेक मारला तरीही ती कार ट्रकला भिडली.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145