Published On : Wed, Jan 24th, 2018

तिरंगा जनजागृती अभियान पोस्टरचे विमोचन

Advertisement


नागपुर: राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे सर्व भारतियांचे कर्तव्य आहे. मुले व युवकांनी, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांनी आणि समस्त नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा, असे आवाहन अशोक पत्की यांनी आज केले.

राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान कामयाब फाऊंडेशनद्वारा आयोजित आणि नाग स्वराज फाऊंडेशन व डॉ.हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करा सम्मान तिरंग्याचा’ जनजागृती अभियान पोस्टरचे प्रकाशन अशोक पत्की सचिव( डॉ.हेडगेवार रक्तपेढी) यांच्या हस्ते आज करण्यात आले.

Advertisement

कामयाब फाऊंडेशन या सामाजिक संस्थेद्वारा गेल्या वर्ष 2010 पासून राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी ‘करा सम्मान तिरंग्याचा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियांनाद्वारे कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज (तिरंगा) उचलण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. नागपूर शहरातील उद्याने, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणावरील पडलेले, फाटलेले, कुजलेले कागदी व प्लॉस्टिकचे ध्वज (तिरंगा) उचलते. 26 जानेवारी व 15 ऑगष्ट या दिवशी लहान मुले, युवक-युवती मोठ्या उत्साहाने राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ घेवून फिरतात व ते कुठेही फेकून देतात यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होतो. असे होवू नये म्हणून कामयाब फाऊंडेशनचे कार्यकर्ते राष्ट्रीय ध्वज उचलून सांभाळण्याचे कार्य करीत आहेत. हा उपक्रम चांगला असल्याचेही अशोक पत्की यावेळी म्हणाले.

24 ते 27 जानेवारी 2018 या कालावधीत जनजागृती अभियान सुरु झाली आहे. या अभियानाच्या दरम्यान पथनाटय, शाळा, महाविदयालयामध्ये स्टीकर, पोस्टर वितरण करुन तिरंगाची माहिती व नियमाची माहिती देऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

या प्रकाशन समारंभाला कामयाब फाऊंडेशनचे अध्यक्ष हितेश डोर्लीकर, प्रकाश कुंटे, प्रकाश कुंडले, सुधीर बापट , मोहन गोखले, हरिभाऊ इंगोले, प्रवीण पाटील, किरण इंगळे, डॉ विनोद निमोणकर, हर्षा डोर्लीकर, यज्ञेश कपले, इतर सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.