Published On : Thu, Feb 7th, 2019

आदिवासी महोत्सव शुक्रवारपासून ‘नागपुर का राजा’ महानाट्याचे होणार सादरीकरण

नागपूर: परंपरागत आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार (ता. ८) व शनिवार (ता. ९)ला दोन दिवसीय आदिवासी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फुटाळा तलाव परिसरात हे आदिवासी महोत्सव आयोजित करण्यात आले आहे.

आदिवासी संस्कृतीला अनेक वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. हा इतिहास व परंपरागत आदिवासी संस्कृतीपासून शहरातील अबालवृद्धांना अवगत करणे हा या आदिवासी महोत्सवाच्या आयोजनाचा हेतू आहे. शुक्रवारी (ता.८) सायंकाळी ५ वाजता राष्ट्रीय जनजाति आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार शाय यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम व राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या माया इवनाते उपस्थित राहतील. उद्घाटन समारंभानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

शनिवारी (ता.९) महोत्सवाच्या समारोप प्रसंगी सायंकाळी ५.३० वाजता ‘नागपुर का राजा’ या महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी आयोजित समारोप कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय जनजाति आयोगाच्या सदस्या माया इवनाते उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर नंदा जिचकार भूषवतील.

कार्यक्रमाला खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार प्रा. अनील सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्ता पक्षनेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, बसपा गटनेता मोहम्मद जमाल, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता दुनेश्वर पेठे, शिवसेना गटनेता किशोर कुमेरिया, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक अमर बागडे, नगरसेविका रूतिका मसराम, डॉ. परिणीता फुके, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे प्रामुख्याने उपस्थित राहतील.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement