Published On : Mon, Jul 6th, 2020

ग्रिनसिटी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

नागपूर : विषाणू व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज गुरूपौर्णिमेच्या निमित्याने वृक्षारोपणाचा “ग्रिन सिटी” वासियांनी आपल्या आजु बाजुच्या परिसरात ग्रिन सिटी परिसरात आज झाडे लावण्यात आली.

त्यामध्ये झाडांची नावे वड, पिंपळ, कडुलिंब, पळस, आवळा, गुलमोहर ईत्यादी दाट सावली देणारी झाडे, ग्रिन सिटीच्या आजुबाजुला झाडे लावली.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोभाजी सावंत व खुशाल राऊत यांनी पुढाकार घेऊन, हा कार्यक्रम घडवून आणला. यासाठी सौ. मेधा चिटगोपेकर, साहिल नागपुरे, जतकर साहेब, प्रणय गोंडाणे, पाठक साहेब, श्री. खवशी, राजूरकर, कोहाड, आदींनी विशेष परिश्रम घेतले.