Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Aug 1st, 2018

  नुतन सरस्वती विद्यालयात वृक्षदिंडीने वृक्षारोपण उत्सवात

  कन्हान :नुतन सरस्वती विद्यालयात वृक्षदिंडी काढुन ” झाडे लावा , झाडे जगवा ” चा जनजागृतीपर संदेश देत उत्साहाने वृक्षारोपण करण्यात आले.

  नुतन सरस्वती विद्यालयात श्री सय्याम सर यांच्या अध्यक्षेत व कांद्रीचे सरपंच बळवंत पडोळे , पर्यावरण श्रेत्र अधिकारी एम बी शिंडे, माजी उपसरपंच धनराज कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढुन ” लावाल वृक्ष तर मिळेल मोक्ष ” वृक्षारोपण करून वृक्षाचे संवर्धन करा.

  असा वृक्षाविषयी जनजागृतीपर संदेश देत शाळा व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले . वृक्ष प्रतिञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल भोवते सर हयानी तर आभार प्रदर्शन सौ चिमोटे मॅडम हयानी केले . यशस्वीते करिता लांडगे सर, चवरे सर, आरेकर सर, राजेश वैध, गजभिये मॅडम व शालेय विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145