Published On : Sat, Aug 24th, 2019

वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे:-ऍड सुलेखाताई कुंभारे

कामठी :-वातावरणाचा वाढता दुष्परिणाम लक्षात घेता ग्लोबल वार्मिंग मुळे ऋतू मध्ये बदल झालेला दिसतो तेव्हा वातावरणाच्या संगोपनासाठी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज झाली असल्याचे मत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी आज ड्रॅगन पॅलेस टेम्पल जवळील डॉ बाबसाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले.याप्रसंगी शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत विविध प्रजातीचे 600 रोपट्यांचे वृक्षारोपण करण्यात आले.

हे वृक्षारोपण कार्यक्रम बहुजन रिपब्लिकन एकता मंच , इंडूसिंड बँक , ग्रीन लाईफ सोशल वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला होता.या वृक्षारोपण कार्यक्रमात बरीएम चे जिल्हाध्यक्ष अजय कदम, नगरसेविका स्नेहलता गजभिये, शहराध्यक्ष दिपंकर गणवीर, दीपक सीरिया, राजेश गजभिये, उदास बन्सोड, अश्फाक कुरेशी, नारायण नितनवरे, राजू भागवत, सुभाष सोमकुवर, सुशील तायडे,अफजल अन्सारी, विष्णू ठवरे, मनोहर गनवीर,प्रवीण नगरकर, इंडूसिंड बँक चे पदाधिकारी विकास श्रीवास्तव, आदी उपस्थित होते. मुरली मेथवाणी, सचिन संकुलवार, विलास कार्लीकर, तसेच गो ग्रीन लाईफ सोशल वेल्फेअर एसोसिएशन चे दिलीप बाबेरिया ,इंद्रिस शेख, खालीद अन्सारी, गुणवंत धोटे, अब्दुल करीम, अनुजा मूलमुले,स्वीटी निकोसे, मो अफसर आमीन, शाहेरोज, शमीम असर, गणेश प्रसाद आदी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी