कन्हान : – भाजपा कन्हान शहर व्दारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री देवेंन्द्र फडणवीस यांचा जन्मदिवस उदयभान जी बोरकर मतिमंद कर्म शाळेत वृक्ष, बिस्कीट व फळाचे वितरण करून थाटात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री देवेंन्द्र फडणवीस यांचा जन्मदिवसी उदयभानजी बोरकर मतिमंद कर्म शाळा कन्हान येथे माजी नगराध्यक्षा अँड आशाताई पनिकर, कैलास बोरकर यांच्या हस्ते मतिमंद विद्यार्थ्यांना वृक्ष, बिस्कीट व फळांचे वितरण करून मुख्यमंत्री फडणवीस यांचा जन्मदिवस थाटात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा कन्हान शहर अध्यक्ष विनोद किरपान, महामंत्री अमोल साकोरे , सुनील लाडेकर, भाजपा कन्हान शहर अनु: सुचित जाती मोर्चा अध्यक्ष हर्ष पाटील, मनोनीत नगरसेवक राजेंन्द्र शेंदरे , प्रसिद्ध प्रमुख ऋृषभ बावनकर, माधव वैद्य, शैलेश शेळकी, रिंकेश चवरे, संतोष वंजारी, मोरेश्वर संतापे, सुनील पाटील सह मतिमंद कर्म शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
			









			
			