File Pic
नागपूर: प्रवाशांनी सुपरफास्ट गाडीतील प्रवाशांनी १५० कि.मी. उकळता प्रवास केला. कारण या गाडीतील बी-२ कोचमधील एसी बंद होता. त्यामुळे नागपूर स्थानकावर प्रवाशांनी गोंधळ घातला. सायंकाळी ५ वाजता नागपूर स्थानकावर येणाºया या गाडीला येथे दहा मिनिटांचा थांबा आहे. मात्र या गोंधळामुळे ही गाडी अखेर ५.३५ वाजता पुढे रवाना झाली.
१२५९२ यशवंतपूर- गोरखपूर एक्सप्रेस मंगळवारी सायंकाळी ५ वाजता नागपूर स्थानकावर आली. त्यावेळी या गाडीच्या बी-२ डब्यातील प्रवासी प्रचंड संतापले होते. कारण चंद्रपूरपासूनच या कोचमधील एसी बंद झाला होता. आधीच उन्हामुळे लोकांना असह्य झाले आहे. त्यात एसी बंद त्यामुळे प्रवाशी संतापले.
सायंकाळी ५ वाजता ही गाडी नागपूर स्थानकावर येताच प्रवाशी कोचमधून खाली उतरले व एसी दुरुस्त झाल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. याबाबत कळताच आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसचे जवान घटनास्थळी पोहोचले. रेल्वेचे अधिकारीही प्लॅटफॉर्मवर आले. त्यानी प्रवाशांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र प्रवासी ऐकायला तयार नव्हते. शेवटी तंत्रज्ञाला बोलावण्यात आले. त्याने या कोचमधील एसी दुरुस्त केल्यावर सायंकाळी ५.३५ वाजता ही गाडी पुढे रवाना झाली.