Published On : Fri, Sep 3rd, 2021

ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होईल – डॉ. नितीन राऊत

उमरेड ग्रामीण भागातील विविध विकास कामांचा शुभारंभ

नागपूर : जिल्हा खनिज निधीतून बांधण्यात येणाऱ्या रस्त्यामुळे मटकाझरी, चिमणाझरी व बेला ठाणा येथील नागरिकांना दळणवळणाची सुविधा मिळून शाळेत जाणारे विद्यार्थी व शेतकरी यांना त्रास सहन करावा लागणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

Advertisement

जिल्हा खनिज निधीतून 35 कोटी रुपयांच्या निधीतून बेला-ठाणा- मटकाझरी-चिमणाझरी-पाचगाव व पाचगाव कुही, आप्तुर या रस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उमरेडचे आमदार राजु पारवे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, उमरेड पंचायत समितीचे सभापती रमेश किलनाके, जि.प समाजकल्याण सभापती नेमावली माटे, जि.प. सदस्या सुनिता ठाकरे, पं.स. सदस्या प्रियंका लोखंडे, पुष्कर डांगरे, नागभिडच्या पं.स. सदस्या गितांजली नागभिडकर, उमरेडचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, पाचगावच्या सरपंच उषा ठाकरे, उपसरपंच राकेश हटवार, यावेळी उपस्थित होते.

Advertisement

गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची मागणी होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विकासाची सर्व कामे स्थगित होती. आज आमदार पारवे यांच्या प्रयत्नाने ते प्रत्यक्षात येत आहे. या सिमेंट कॉक्रिंट रस्त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना कामकाजासाठी सुलभ दळणवळण मिळेल. सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून खदान क्षेत्रात रस्त्याच्या बाजून रिर्टनिंग वाल बांधण्यात येणार आहे. तसेच रोड फर्निचर व इतर बांबींचा अंतर्भूत करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटातून आपण बाहेर पडत असलो तरी अजून कोरोना संपला नाही, त्यामुळे मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक असल्याचे यावेळी पालकमंत्री म्हणाले.

15 वर्षापासून असलेली मागणी पूर्ण झाल्याबद्दल आमदार राजू पारवे यांनी मंत्रीमहोदयाचे आभार मानून उमरेड मतदार क्षेत्रात प्रलंबित सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे सांगितले. यामुळे नागरिकांना दवाखान्यात जाण्यास तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक, जि.प. सदस्या सुनिता ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच उषा ठाकरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार काकडे यांनी मानले. यावेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, जि.प. सदस्य, परिसरातील गावाचे सरपंच, उपसरपंच व नागरिक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement