Published On : Thu, Mar 26th, 2020

संचारबंदीत सुध्दा अवैध जनावरांची वाहतुक सुरू

दोन गाय, तीन गोरे ओमनी कार मध्ये कोबुन नेताना पकडले.

कन्हान :- संपुर्ण देशात, राज्यात संचार बंदी असताना सुध्दा मध्य प्रदेशातुन कामठी कत्तलखान्यात मारूती ओमनी कार मध्ये अवैधरित्या पाच जनावरे कोबु न भरून नेताना कन्हान पोलीसानी पक डुन एका आरोपीस अटक करून एक लाख ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

कन्हान पोलीसाना मिळालेल्या गुप्त माहिती वरून सोमवार (दि.२३) ला रात्री १० वाजता दरम्यान तारसा रोड चौकात संपुर्ण देशात, राज्यात संचारबंदी (लॉक डाऊन) असताना सुध्दा मध्यप्रदेशातुन कामठी कत्तलखान्यात मारूती ओमनी कार क्र. एम एच ३१- ए आर -२३६ मध्ये अवैधरित्या दोन गाय,तीन गोरे असे पाच जनावरे कोबुन भरून नेताना कन्हान पोलीसानी पकडुन दोन गाय किमंत १६ हजार, तीन गोरे १५ हजार व ओमनी कार एक लाख असा एकुण एक लाख ३१हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी मोहम्मद फिरोज अब्दुल हफीज अन्सारी रा. नया बाजार कामठी यास अटक केली.

उशीरा रात्री गोरक्षण मध्ये पाचही जनावरे सोडुन त्याना जिवनदान दिले. ही कार्यवाही कन्हान पोलीस स्टेश नचे थानेदार अरू़ण त्रिपाठी यांच्या मार्ग दर्शनात ए एस आय राजेंद्र पाली, कॉ. मंगेश सोनटक्के, राहुल रंगारी, संजु भद्रोरिया, राजेन्द्र गौतम हयानी करून पाच जनावरांना जिवनदान दिले .