Published On : Mon, Jun 11th, 2018

राज्य सरकाने केल्या ८ वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारच्या वतीने आज वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये ८ वरिष्ठ अधिका-यांचा जबाबदाऱ्यांमध्ये बदल झाले आहेत. पर्यावरण विभागातील सतीश गवई यांची आता उद्योग विभागात बदली करण्यात आली आहे. तर गृह विभागाचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल असणार आहेत.

आतापर्यंत गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेले सुधीर श्रीवास्तव यांची बदली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव अनिल डिगीकर यांची बदली पर्यावरण विभागात करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांची बदली परिवहन विभागात करण्यात आली आहे.

शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची बदली करण्यात आली असून, त्यांना सामान्य प्रशासन विभागात पाठवण्यात आले आहे. बांधकाम विभागात आशिषकुमार सिंह यांच्या जागी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.