| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Feb 2nd, 2018

  २०० चौ.मी.पर्यंतच्या क्षेत्रफळाच्या भूखंडांच्या मंजुरीचे अधिकार आर्किटेक्टकडे सुपूर्द करा : संजय बंगाले


  नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या २०० चौ.मी. पर्यंत क्षेत्रफळ असणाऱ्या मोकळ्या भूखंडांच्या मंजुरीचे अधिकार आर्किटेक्टकडे सुपूर्द करण्याचे निर्देश स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले. बुधवार (ता.३१) ला मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित स्थापत्य व प्रकल्प समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

  यावेळी बैठकीत समिती उपसभापती अभय गोटेकर, सदस्या सुषमा चौधरी, रश्मी धुर्वे, शेख मो.जमाल मो. इब्राहीम, स्मार्ट सिटी, हॉटमिक्स विभागाचे अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  नगररचना विभागात या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या इमारतीच्या मंजूर नकाशाची संख्या व त्यापासून मिळालेले उत्पन्न याचा आढावा घेण्यात आला. ८३० प्रकरणातून २३० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत ७२ कोटी ८२ लक्ष उत्पन्न आहे. मार्च २०१८ पर्यंत ९० कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. सन २०१७-१८ ची मिळकत १०५ कोटी इतकी असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

  या चालू वर्षात देण्यात आलेल्या टीडीआर संख्येचा आढावा यावेळी सभापतींनी घेतला. आतापर्यंत सन २०१७-१८ या वर्षात १० भूखंडांना टीडीआर देण्यात आलेला आहे. नागरिकांना चांगली, पारदर्शक आणि जलद विकास परवानगी सेवा देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासंदर्भात बैठकीत आढावा घेण्यात आला.

  सर्व रस्त्यांवरील खोदकामाच्या जागी संबंधित संस्थेकडून काम किती दिवसात पूर्ण होईल याचे सूचना फलक लावण्यात यावे, असे निर्देश संजय बंगाले यांनी दिले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145