Published On : Wed, Jun 9th, 2021

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत बीएलओ ला प्रशिक्षण

कामठी – भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षण कार्यक्रम अंतर्गत आजपासून मतदान केंद्र स्तरीय अधिकारी(बीएलओ)हे घरोघरी जाऊन मतदार याद्यांची पडताळणी करनार आहेत त्याचप्रमाणे दुबार नोंदी व मयत किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित व्यक्तीची माहिती सुद्धा संकलन करणार आहेत तेव्हा या कामातून मतदार यादी अधिकाधिक निर्दोष करण्याच्या दृष्टीने कामठी तालुक्यातील समस्त बीएलओ ना कामठी तहसील कार्यालयात काल 5 जून ला शहर व ग्रामिनच्या बीएलओना मतदार यादी पुनररिक्षन कार्यक्रम चे प्रशिक्षण देण्यात आले.

Advertisement

हे प्रशिक्षण तहसीलदार अरविंद हिंगे, यांच्या मार्गदर्शनार्थ नायब तहसीलदार एस कावटी, उके, अव्वल कारकून चंद्रिकापुरे ,यांनी दिले।यावेळी एकूण 245 बीएलओ पैकी शहरी व ग्रामीन च्या बहूधा बीएलओ चा समावेश होता.

Advertisement

यानुसार बीएलओ घरोघरी भेटी देऊन ज्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये नाही अश्या मतदारांचा शोध घेऊन त्यांची फोटो गोळा करणे किंवा तो मतदार कायम स्वरूपी स्थानांतरित झाला असेल अश्या मतदारांचे पंचनामे तयार करणे ,चे मार्गदर्शन करण्यात आले..यावेळी नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतून नावे वगळणे, नावांमध्ये दुरुस्ती, छायाचित्र व स्थलांतर व इतर दुरुस्तीसाठी वेगवेगळे अर्जाचे नमुने भरून घेतले जाणार आहे .सध्यस्थीतीत कामठी तालुक्यात एकूण 2 लक्ष 30 हजार 851 मतदारसंख्या असून यामध्ये 1 लक्ष 18 हजार 156 पुरुष मतदार , 1 लक्ष 12 हजार 690 मतदार तसेच 5 तृतोयपंथी मतदारांचा समावेश आहे

Advertisement

या विशेष मतदार यादी पुनररीक्षन कार्यक्रमात किती मतदार संख्याची वाढ होते वा कमी होते हे लवकरच निदर्शनास येनार आहे तसेच कामठी तालुक्यात एकूण 8970 मतदारांचे फोटो गोळा करणे शिल्लक आहेत.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement